Uncategorized

the name of the deaf and dumb residential school but he taking money from the staff as a corruption

[ad_1]

जालना : जालना ( Jalna ) शहरात तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे स्व. राजीव गांधी मूकबधिर निवासी विद्यालय ( Rajiv Gandhi Muk Badhir Nivasi Vidyalay ) आहे. संस्थेचे अध्यक्ष भास्कर गाडेकर हे औरंगाबाद येथील फुलंब्री तालुक्यातील गिरसावडी येथे राहतात. सदर निवसई विद्यालयात अनेक मूक बधिर अपंग मुले निवासाला आहेत.

या संस्थेमध्ये एक कला शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत आहेत. शासन नियमाप्रमाणे वरिष्ठ शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्यासाठी हा शिक्षक मुख्याध्यापकांना वारंवार विनंती करत होता. त्याची ती अनेकदा करण्यात आलेली विनंती ऐकून अखेर मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाला संस्था अध्यक्ष गाडेकर यांना भेटण्यास सांगितले.

अध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्याकडे त्या शिक्षकाने भेटीची वेळ मागितली. अध्यक्षाने भेटीची वेळ दिली. या भेटीत अध्यक्षांनी त्या शिक्षकाकडे त्याचे काम करून देण्यासाठी ५ हजार रुपये द्या तुमचे काम करून देतो. तसेच ही रक्कम त्यांच्या खाजगी शिपायाच्या खात्यावर पे फोनद्वारे करा असे सांगितले.

आपले काम होतंय म्हणून त्या शिक्षकाने त्यावेळी गाडेकर यांच्या खाजगी शिपायाच्या फोन पे खात्यात ती रक्कम जमा केली. मात्र, अनेक दिवस झाले तरी त्याचे काम झाले नाही म्हणून शिक्षकाने पुन्हा अध्यक्ष गाडेकर यांची भेट घेतली. 

यावेळी गाडेकर यांनी त्याच्याकडे पुन्हा ४५ हजारांची मागणी केली. त्या शिक्षकाला इतकी रक्कम देणे शकय नव्हते. तसेच, त्याची उडवाउडवीची उत्तर ऐकून त्याचा गाडेकर यांच्यावरील विश्वास उडाला. त्याने थेट जालना लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठत भास्कर गाडेकर याच्याविरोधात तक्रार दिली.

त्या शिक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्या शिक्षकाने गाडेकर यांच्याशी संपर्क करत त्यांना पैसे देण्यासाठी जालना -औरंगाबाद रस्त्यावर बदनापूर येथे बोलावले. गाडेकर यांनी पैसे घेण्यासाठी आपल्या खाजगी शिपायाला पाठवले. बालाजी आईस्क्रीमच्या गाडीजवळ हा व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी खाजगी शिपायाला अटक केली.

लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अधिक तपास केला असता फोन पे द्वारे पाच हजारांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. यानुसार अधिकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष भास्कर गाडेकर आणि त्यांचे खाजगी शिपाई रंजीत राठोड यांच्याविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संस्थाचालक भास्कर गाडेकर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या तावडीतून फरार झाला आहे. परंतु, खाजगी शिपाई मात्र अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक एस. एम. मोटेकर, ज्ञानेश्वर मस्के, शिवाजी जमदाडे आदी अधिक तपास करत आहेत.

[ad_2]

Source link