Uncategorized

Rain : राज्यात ‘या’ दोन दिवशी गडगडाटासह जोरदार पाऊस

[ad_1]

मुंबई : Rainfall in  Maharashtra : देशभरात उष्णतेची लाट असताना आता पावसाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain Forecast) त्याचवेळी गारपिटीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. (Heavy Rain Hit Some Parts Of Maharashtra)

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD)सोमवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे . महाराष्ट्र, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, हिमालाय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होईल. त्याचवेळी विजांचा कडकडाट होईल. त्याचवेळी गारपीट होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

जोरदार पडणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो. तसेच देशातील आसाम आणि मेघालय राज्यात पावसासह गारपीठ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात भारनियमन सुरु आहे. त्यात तीव्र उन्हामुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. 



[ad_2]

Source link