Uncategorized

Health news: द्राक्षांचे आरोग्याला होणारे 5 फायदे

[ad_1]

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. 

– द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून  तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे. 

– शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

– द्राक्ष खाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर डाग दूर होतात. सुरकुत्यांपासून सुटका होते.

– सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.

– द्राक्षामुळे रक्तातील नायट्रिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहते. 



[ad_2]

Source link