Uncategorized

‘या’ रक्तगटाच्या लोकांना डायबिटीसचा धोका अधिक

[ad_1]

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) आकडेवारीनुसार जगात ४३ कोटी लोकांना मधुमेहाचा (Diabetes) विकार आहे, ज्यात ८ कोटी रुग्णांचं प्रमाण तर एकट्या भारतात आहे. डायबिटीस हा असा आजार आहे, जो एकदा झाला, की पूर्णरित्या बरा होत नाही. 

युरोपियन असोसिएशनच्या डायबिटोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, ज्यांचा रक्त गट (Blood Group) A किंवा B गटातला आहे, अशांना टाईप २ डायबिटीस होण्याचा धोका जास्त आहे. 
या दोन ग्रूपच्या तुलनेत Blood Group O गटाला हा धोका कमी आहे. 

या अभ्यासात ८० हजार महिलांचा समावेश केला होता. ज्यामध्ये रक्त गट आणि टाईप २ डायबिटीजचा काय संबंध आहे, हे तपासण्यात आलं. यामध्ये ३ हजार ५५३ महिलांना टाईप २ डायबिटीज झाल्याचं लक्षात आलं, या महिलांचा ब्लड ग्रूप O नव्हता. 

Blood Group B असलेल्यांना धोका अधिक

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे रक्तगट अ पेक्षा रक्तगट ब असणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. या अभ्यास केलेल्या महिलांमध्ये १० टक्के महिला अशा होत्या, ज्यांचा रक्तगट A होता, आणि त्यांना टाईप २ डायबिटीस झालेलं. मात्र २१ टक्के महिला अशा होत्या ज्यांचा रक्तगट B होता, आणि त्यांना टाईप २ डायबिटीस झाला आहे. 

ज्यांचा ब्लड ग्रूप O नसतो, त्यांच्यात एका विशिष्ट प्रकारचं प्रथिन असतं. ज्यामुळे रक्तातील शुगरचं प्रमाण वाढते. याशिवाय असे अनेक मॉलेक्युल्स असतात, ज्यांचा संबंध टाईप २ डायबिटीसशी आहे. 



[ad_2]

Source link