Uncategorized

जंक फूड खाण्याची सारखी क्रेविंग होतंय? ज्यामुळे तुमचं डायट खराब होतंय? मग या टिप्स फॉलो करा

[ad_1]

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे. ज्यामुळे आपले वजन तर वाढतेच या व्यतीरिक्त आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या पाचनशक्तीवरती देखील त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे लोकांना ते न खाण्याचा डॉक्टर सल्ला देताता. डॉक्टरांच्या मते चांगल आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जंक फूड खाणं आपण सोडलं पाहिजे आपल्या डॉक्टरांचे हे म्हणणे अनेकदा पटते सुद्धा परंतु तरीही जंक फूड सोडण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण ते सोडू शकत नाही.

जंक फूड हे एखाद्या व्यसना सारखे आहे. जे सुट म्हटलं तरी सुटत नाही.त्यामुळे हे व्यसन सोडण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. ते जाणून घ्या.

पुरेसे पाणी प्या – शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्या. पिण्याच्या पाण्याने अन्नाची लालसा कमी करता येते. याशिवाय, यामुळे तुमची भूक शांत राहते.

कमी कालावधीत खा – जंक फूडची तल्लफ कमी करण्यासाठी, पौष्टिक अन्न कमी वेळाच्या अंतराने घ्यावे. मध्यम प्रमाणात खाल्ल्याने लालसा नियंत्रित केला जाऊ शकतो.

पुरेशी झोप घ्या – तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप घेतलेल्या लोकांना कमी भूक लागते. याशिवाय गोड आणि खारट अन्न खाण्याची क्रेविंग देखील होते.

नाश्ता वगळू नका – जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही, तर काही वेळानंतर तुम्हाला गोड किंवा जंक फूड खाण्याची क्रेविंग जाणवते. या व्यतिरिक्त, जर तुम्ही जास्त तास उपाशी राहिलात, तर तुम्हाला चटपटीत गोष्टी खाण्याचे मन होते, म्हणूनच नाश्ता वगळू नये.

अन्न चावून खा – हे आपल्या पचनासाठी देखील चांगले आहे. ज्यामुळे आपल्याला चटपटीत खाण्याचे मन होत नाही.

प्रथिनेयुक्त गोष्टी खा – आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने घेतल्याने क्रेविंग नियंत्रित करता येतो. कारण कार्बोहाड्रेटपेक्षा प्रथिने पचायला जास्त वेळ घेतात. जे तुमच्या शरीरासाठी चांगले आहे.



[ad_2]

Source link